Mahsul Vibhag Bharti : महसूल विभागात 13536 रिक्त जागा तलाठी, लिपिक, शिपाई संवर्गासाठी भरती

Mahsul Vibhag Bharti: महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामध्ये तब्बल 13536 रिक्त जागां असून यामुळे सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा कामाचा खोळंबा होत आहे, सर्वाधिक पदेही तलाठ्याची रिक्त असून 4122 तलाठ्यांच्या (Talathi Bharti) पदासाठी 29 नोव्हेंबर रोजी पत्र काढून सुद्धा आणखी भरती घेण्यात आलेली नाही.

महसूल विभागातली ही सगळी पदे एकदाच भरण्यात येणार असून यामध्ये तब्बल 13536 पदे रिक्त आहेत तलाठी संवर्गाची 5030 पदे रिक्त असून 4122 पदांसाठी भरती करण्याचे नियोजन केले आहे, तसेच शिपाई पदासाठी 2375 जागा रिक्त आहेत.

याशिवाय कनिष्ठ लिपिक 532 जागा, मंडळ अधिकारी अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, लघुटंकलेखकच्या 25 ते 75 जागा रिक्त आहेत, या रिक्त जागा न भरल्यामुळे एकच अधिकाऱ्याकडे जास्तीत जास्त कामे येऊ लागलेत आणि याचा सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एखाद्या कामासाठी सर्वसामान्यांना वारंवार महसूल कार्यालयात हेलपटे मारावी लागत असल्याचे दिसत आहे शेतकऱ्याचा वारंवार संपर्क होणाऱ्या तलाठीचे महसुली विभागात (Mahsul Vibhag Bharti) सर्वाधिक रिक्त पदे असून हा आकडा 5030 पदांचा असणार आहे.

त्याशिवाय तहसीलदार, नायब तहसीलदार यांची 523 पदे महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यावर कामाचा भार जास्त झाला आहे त्यांच्याकडची कामे प्रलंबित राहत आहेत.

त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आले की पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग त्याने मग प्रलंबित कामाचा बोजा वाढत जातो त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो.

तलाठी भरती व इतर पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेल्या आहेत पण आणखी वरती झालेले नाही सध्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यावर सोपवण्यात आलाय त्यामुळे ग्राम पातळीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विविध कामांना विलंब होत आहे.

येत्या ऑगस्ट 2023 पर्यंत या सर्व भरत्या निघणार असून महसूल विभागात 23000 जागा आहेत सोबतच ग्रामविकास विभागामध्ये 13000 कृषी विभागात 10 हजार व इतर विभागात तब्बल 25 ते 30 हजार जागा रिक्त असून ऑगस्ट 2023 पर्यंत 75000 जागा भरण्याचे महाराष्ट्र सरकारने योजले आहे.

👉एसटी महामंडळ जाहिरात पहा

Leave a Comment