जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना आपल्याला या बाबी विचारात घेऊन तपासून पाहणे तेवढंच महत्त्वाचं असतं आवश्यक असते. जमिनीचे सातबारा उतारा, आठ-अ, चा उतारा पाहणे गरजेचे असते, त्याबरोबरच त्या जमिनचा इतिहास म्हणजेच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, खरेदी विक्री होत असलेल्या जमिनीचे खरेदी खत तपासून पाहणे खुप महत्वाचे असते, त्यामुळे आपल्याला जमिनीचा इतिहास कळेल, आणि आपली फसवणूक होणार नाही.