Pik vima yojana: पीक विमा भरण्यास सुरुवात एक रुपयात टोकण घ्या आणि मोफत पीकविमा भरा पीक पेरा प्रमाणपत्र येथे डाऊनलोड करा

Crop insurance news: राज्यातील शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यांचे हे अर्थिक नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात येते. मात्र, शेतीची मशागत बियाणे खते यांच्या वाढत्या किंमती पाहता पीक विम्याचा हप्ता काही वेळेस शेतकऱ्यांना भरणे जड जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा घेत नाहीत. त्यांची ही अडचण ओळखून राज्य शासनाने सर्वसामावेश पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिस्स्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ही योजना खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी सन 2023-24 पासून ते 2025-26 या तीन वर्षासाठी राबविण्यात येणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) कृषी विभागामार्फत राबवण्यात येते. सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना या योजनेद्वारे विमा हप्त्याची सोय शेतकरी हिस्स्या रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे  आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर आपल्या पिकांचा विमा भरता येईल. इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी फक्त एक रुपयाचे टोकन आकारले जाईल.

👉पीक पेरा येथे डाऊनलोड करा
DOWNLOAD PDF

यासाठी मिळणार नुकसान भरपाई
सर्व समावेशक पीक विमा योजना खरीप व रब्बी दोन्ही हंगामाकरिता खालील बाबींकरिता राबविण्यात येईल

१) हवामान बदल प्रतिकुल घटकामुळे व कमी पावसामुळे पीक पेरणी / लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान  (Prevented sowing/Planting/Germination)

२) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान (Mid season adversity)

३) पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक आग, सतत पाऊस, क्षेत्र जलमय, गारपीट, चक्रीवादळ, वीज कोसळणे, पूर परिस्थिती, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड  व रोगराई मुळे उत्पन्नात होणारी घट (पीक कापणी प्रयोगावरून)

४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान  (Localised Calamities).

५) नैसर्गिक कारणामुळे होणारे काढणीपश्चात नुकसान  (Post harvest Losses).

👉मोफत स्वतः पीक विमा भरण्यासाठी येथे क्लिक करा

कोकणातील भात, नाचणी व उडिदचा समावेश

येत्या खरीप हंगामामध्ये कोकण विभागामध्ये भात, नाचणी व उडिद या  पिकांकरीता पीक विमा उतरविता येईल. सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार नुकसान भरपाई अदा करण्यात येईल. पिकांचे सरासरी नुकसान काढताना भात, गहू, सोयाबीन व कापूस पिकांच्या किमान 30 टक्के भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देण्यात येणार आहे. त्याचा पीक कापणी प्रयोगांमार्फत प्राप्त उत्पन्नास मेळ घालून पिकांचे उत्पादन निश्चित करण्यात येईल. उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोगांच्या  आधारावर निश्चित करण्यात येणार आहे.

👉Crop insurance Ratio पीक विमा गुणोत्तर कसे असणार येथे पहा

Pik vima yojana पीक विमा योजना अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

योजनेची अंमलबजावणी करताना रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन, स्मार्टफोन, डिजिटल प्लॅटफॉर्म इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर पीक विमा योजना योजनेमध्ये शेतकरी पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभागी होऊ शकतात. शेतक-यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत  विमा संरक्षण देतांना कमी पाऊस, पावसाचा खंड, सतत पाऊस, जास्त पाऊस, जास्त तापमान, आर्द्रता यानुसार विमा संरक्षण कालावधीची विभागणी करून विमा संरक्षण दिले जाते.

👉पीक पेरा येथे डाऊनलोड करा
DOWNLOAD PDF

Home Page..

Leave a Comment