आयुष्मान कार्ड काढा योजनेअंतर्गत मिळतो 5 लाख रुपये पर्यंत लाभ

Ayushman bharat या योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये मदत आयुष्यमान कार्ड काढा

केंद्र सरकारची ‘आयुष्यमान भारत’ व राज्य सरकारच्या ayushman bharat ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’चे एकत्रीकरण करून राज्य सरकारने राज्यातील १२ कोटी नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्फत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

केंद्र सरकारच्या ayushman bharat यादीतील १,९०० आजारांवर या योजनेतील रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री ना.श्री.मनसुख मांडवीय, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस.गोपालकृष्णन, उपसंचालक श्री.रोहित झा यांच्याशी संवाद साधला आहे.

आयुष्माणभारत कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत १ कोटी आरोग्य कार्डचे वाटप ऑगस्टपर्यंत तर १० कोटी आरोग्य कार्ड पुढील ६ महिन्यात वाटली जातील. केंद्र व राज्य सरकारची योजना एकत्र केल्याने केंद्राचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिक भारही कमी होण्यास मदत होणार आहे.

वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडे राज्याने ayushman bharat ६,००० कोटी रुपयांची मागणी केली आहे. केंद्राने ३,००० कोटी रुपये दिले आहेत. निधी वेळेत खर्च केल्यास उर्वरित रक्कमही देण्याची तयारी श्री.मांडवीय यांनी दाखविली आहे.

त्यामुळे ग्रामीण आरोग्य सुविधांसाठी केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक विभागाकडून वेगवेगळ्या दराने औषधांची खरेदी होते. हे टाळण्यासाठी लवकरच महामंडळ कार्यरत होणार असून त्यामार्फत औषधे खरेदी केली जाणार आहेत.

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील गरजू रुग्णांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी सदरील निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त आहे.

आयुष्माणभारत कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment