zilla parishad yojana: नमस्कार मित्रांनो आपल्या पोर्टलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील माहिती शेतीविषयक, सरकारी योजना विविध क्षेत्रातील उपलब्ध नोकरीच्या संधी, अशा प्रकारची माहिती देत असतो. अशीच एक महत्वाची अपडेट म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत 20 अधिक योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. तुमच्या जिल्हापरिषद याबाबत माहिती तुमच्या स्थानिक ठिकाणी घ्या, योजना चालू असतील; तर तुम्हाला या ठिकाणी चालू असलेल्या योजनेसाठी अर्ज करता येतो. यासाठी संपूर्ण माहिती वाचा जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत योजना सध्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. स्वउत्पन्नातून 20 % टक्के उपकार योजना आणि 5 % टक्के दिव्यांग कल्याण निधी या दोन योजना सध्या सुरू आहेत. दिव्यांग कल्याण निधीमधून दिव्यांग व्यक्तींना 100 टक्के अनुदान हे दिले जाणार आहे.
👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉यावर क्लिक करा👈
समाज कल्याण विभागामार्फत खालील दिलेल्या योजना ह्या राबविण्यात येणार आहेत.
मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र या इतर साहित्य पुरविणे मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषार संच पुरविणे •
मागासवर्गीयांना 5 एचपी पाण्यातील विद्युत पंप पुरविणे
मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी मशीन पुरविणे
दिव्यांगांना झेरॉक्स मशीन पुरविणे
दिव्यांगांना स्वयंचलित सायकल पुरविणे
दिव्यांगांना मिनी पिठाची गिरणी पुरविणे
अटी व शर्ती मागासवर्गीयांसाठी zp yojana
1. आधार कार्ड व
2. रहिवासी प्रमाणपत्र
3. लाभार्थी हा ग्रामिण भागातील मागासवर्गीय असावा
4. लाभार्थी हा दरिद्रय रेषेखालील असुन निवड ग्रामसभेमार्फत
5. जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याचे असणे आवश्यक राहील .
6. लाभार्थीचे व 18 वर्षेपेक्षा कमी नसावे .
7. लाभार्थीच्या नावाचा 7/12 असणे आवश्यक
8. यापुर्वी कृषी विभाग, महिला बालकल्याण किंवा इतर विभागामार्फत लाभ घेतलेला नसल्याचे ग्रामसेवक / ग्राविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र. Government scheme
9. लाभार्थीकडे स्वतःचे मालकीची 500 चौ.फु. जागा असावी. त्यासाठी नमुना नं. 8 अ किवा 7/12 असावी. (ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे.)
10. लाभार्थी बेघर असावा किंवा लाभार्थीकडे पक्के घर नसावे.
दिव्यांगांसाठी अटी व शर्ती zp yojana
1. लाभार्थी हा ग्रामीण भागातील असावा तसेच वय 18 वर्ष पेक्षा कमी नसावे .
2. लाभार्थीचे दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र 40 % पेक्षा कमी नसावे.
3. यापुर्वी लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र ,
4. लाभार्थीकडे आधार कार्ड असणे आवश्यक.
5. लाभार्थीकडे स्वतःचे मालकीची 500 चौ.फु. जागा असावी. त्यासाठी नमुना नं. 8 अ किंवा 7/12 असावी. (ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे.)
6. लाभार्थी बेघर असावा किंवा लाभार्थीकडे पक्के घर नसावे.