Tur Market : तुरीचे भाव वाढले प्रति क्विंटल १० हजार रुपये आजचे दर जाणून घ्या.
Tur Rate : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारातील (भुसार मार्केट) तुरीच्या दरातील सुधारणा कायम आहे. Tur Market Today
कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अंतर्गत धान्य बाजारातील (भुसार मार्केट) तुरीच्या दरातील सुधारणा कायम आहे. तुरीचे सरासरी दर १० हजार रुपयांवर पोहचले आहेत,’’ अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
👉शेतमाल शासनाकडे तारण ठेवून मिळवा कर्ज असा करा अर्ज
धान्य बाजारात सध्या स्थानिक परिसरातून तुरीची आवक होत आहे. गतवर्षीच्या हंगामात तुरीची उत्पादकता घटल्याचा परिणाम बाजार समितीतील तुरीच्या आवकेवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्मी देखील आवक होत नाही. त्यामुळे धान्य बाजारात आठवड्यातील एक दिवसाआड तुरीची आवक घेतली जात आहे.
मागील आठवड्यात मंगळवार (ता.६) ते शनिवार (ता.१०) या कालावधीत तुरीची ६३५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल किमान ९८०० ते कमाल १०२८५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.१०) १८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ९८०० ते कमाल १०२३० रुपये तर सरासरी १००१५ रुपये दर मिळाले.