NAMO Shetkari Scheme : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ; नमो शेतकरी महासन्मान निधीचा गुरुवारी पहिला हप्ता

NAMO Shetkari Scheme : शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ; नमो शेतकरी महासन्मान निधीचा गुरुवारी पहिला हप्ता

NAMO Shetkari : राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या महत्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केलेली आहे. अंमलबजावणी ची प्रतीक्षा होती की शेतकऱ्यांना याचा पहिला हप्ता कधी येणार तर या योजनेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये २६ ऑक्टोबर रोजी १ कोटी १५ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

Pm Kisan मोदी सरकारकडून पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ६,००० रुपयांचा वार्षिक रोख लाभ दिला जातो, तो २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. सरकार लवकरच कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात १५ वा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधींतर्गत प्रति वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. या अंमलबजावणीचा लवकरच शुभारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांना आता १२ हजार रुपये मिळणार आहेत.

 

या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 12000 रुपये यादीत नाव पहा

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेसाठी पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांचा निधी मंजूरी केला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिला जाणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे ४ हजार रुपये मिळणार आहे.

Home

Leave a Comment