कर्जमाफी 2019 साठी निधी वितरित शासन निर्णय जाहीर
राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ कर्जमाफी करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु. ५२५१२.०० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी रु. ५०.०० लाख इतका निधी उपलब्ध आहे. shetkari karjmafi yojana
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. ५०.०० लाख (रु. पन्नास लाख फक्त) एवढा निधी राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४२५ ०१३३) ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. mjpsky
संपूर्ण शासन जीआर येथे पहा
या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार लाभ
सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त उपनिबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे. सदर निधी आहरण करुन वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी.