‘सीसीआय’ची कापूस खरेदीला सुरूवात, आजचे बाजार भाव पहा
पुढील आठवड्यामध्ये तेलंगणा राज्यात कापूस खरेदी सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या देशात जवळपास 53 कापूस खरेदी केंद्र सीसीआय कडून सुरू करण्यात आलेली आहेत. तर तेलंगणामध्ये जवळ जवळ 120 कापूस खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. महाराष्ट्रा राज्यातही किती कापूस खरेदी केंद्रे सुरू करायची, याचे नियोजन सुरुझालेले दिसत आहे. परंतु दिवाळीनंतर महाराष्ट्रातील कापूस खरेदी सुरू होईल, असेही संकेत सीसीआयच्या सूत्रांकडून अलीकडे देण्यात आले आहेत.
हेही वाचा- अग्रीम विम्याबाबत मोठी घोषणा काय म्हणाले कृषिमंत्री पहा?
सुमारे 10 लाख कापूस गाठींच्या खरेदीचे नियोजन तूर्त केंद्र सरकारने मध्य प्रदेशसह उत्तर भारतामध्ये केलेले आहे. तसेच सुमारे 5 लाख गाठींची खरेदी तेलंगणामध्ये केली जाणार आहे . महाराष्ट्र राज्यातील खरेदी या तुलनेत अधिकची असणार आहे, अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे.
जवळ जवळ 42 लाख हेक्टरवर यंदा राज्यात कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून जवळपास 400 लाख क्विंटल कापसाच्या उत्पादनाचा अंदाज आहे. जवळपास 162 कापूस खरेदी केंद्र सीसीआय महाराष्ट्रात अकोला व छत्रपती संभाजीनगर या विभागांतर्गत कापूस खरेदीसंबंधी सुरू करण्याच्या तयारीत आहे. यात सर्वाधिक कापूस खरेदी केंद्र विदर्भामध्ये असतील तर खरेदी केंद्र निश्चित आहेत. त्यात खरेदीसंबंधीची तयारी देखील पूर्ण झालेली आहे.अशी माहिती CCI कडून देण्यात आलेली आहे.