कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर सरकार खरेदी करणार या दराने..

कृषी विभागाच्या विविध विकासाच्या योजना विकसित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत.

Crop insurance पहिला निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट एक रुपयांमध्ये पिक विमा, Pm kisan beneficiary पीएम किसान योजनेतील अडकलेल्या शेतकऱ्यांना त्रुटी दूर करून पुन्हा योजनेत सहभागी करण्यासाठी मोहीम हाती घेतली, त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना फळबागेसाठी लागणाऱ्या खतांसाठी शंभर टक्के अनुदान, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना राबवून ही योजना देखील प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे याच्यासाठी कृषिमंत्री प्रयत्न करत आहेत.

त्याचबरोबर आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेड मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 प्रमाणे कांदा खरेदी करणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना यापासून दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर इतरही कृषीच्या विविध योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषिमंत्री स्वतः लक्ष घालत असल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे.

अनेक वेळा अनेक शेतकरी तक्रार करत आहेत मात्र त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही यासाठी सुद्धा एक हेल्पलाइन नंबर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी चालू केला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना योजना मिळत नाही त्या शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम कृषी विभागामार्फत केले जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आजच कृषीमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे त्यामुळे इथून पुढे कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही आणि भविष्यात देखील शासनाच्या विविध योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचतील.

कृषि विभाग महाराष्ट्र शासन कृषि सेवक 2109 पदांची भरती संपूर्ण जाहिरात येथे पहा

 

कांदा निर्यात शुल्क कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री पियुष गोयल (piyush goyal) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

या बैठकीनंतर केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जपान दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ही माहिती ट्वीट करत दिली आहे. “महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल,” असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादाय बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार तब्बल दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार आहे. नाशिक, अहमदनगर येथे ही कांद्याची खरेदी केंद्रे असणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकार हा कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करणार आहे. निर्यात शुल्कावरुन कांदा प्रश्न पेटलेला असतानाच सरकारने मोठी घोषणा केली आहे.

“15 रुपये प्रमाणे कांद्याची खरेदी झालेली आहे. नाफेडकडून केंद्र सरकारने तीन लाख टन कांदा खरेदी केला आहे. पण इथून पुढचा जो दोन लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे 2410 रुपयांनी क्विंटलप्रमाणे खरेदी केला जाणार आहे,” अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

नमो शेतकरी योजनेचा 2000हफ्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात यादी पहा

Leave a Comment