Earth Rotation: पृथ्वी जमिनीवरुन फिरताना व्हिडीओ पहिला का? Viral Video

Video Viral: पृथ्वी ही स्वतः भोवती फिरत असते. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 लागतात आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी तिला 365 दिवस लागतात. पण पृथ्वी ही फिरताना किंवा प्रदक्षिणा करताना तुम्ही कधी पाहिली आहे का?

पृथ्वी कशी फिरते, तिचा वेग किती असतो, ती फिरताना भूगर्भात काही हालचाली होतात का?, किंवा त्याचा परिणाम पृथ्वी तळावरील जीवसृष्टीवर परिणाम होतो का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील.

Viral Video : बापरे! घरात सापडली तब्बल शंभर नागाची पिल्लं; काळजात धस्स करणारा VIDEO

अशात आता जमिनीवरून पृथ्वी कशी फिरते याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स टाकत आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हालाही काहीतरी अद्भुत पाहिल्यासारखे वाटेल.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. आजवर NASA च्या माध्यमातून अंतराळातील देखील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण या व्हिडीओतून तुम्ही पृथ्वीरूनच पृथ्वी कशी फिरते याचं अनोखं दृश्य तुम्ही पाहू शकता.

पहा व्हिडीओ –

 

 

 

मार्टीन नावाच्या व्यक्ती ने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तसेच सोशल मीडियावर प्रसारित केलाय. तुम्ही पाहू शकता की 360 डिग्री मध्ये पृथ्वी कशी फिरते आहे. या मध्ये पृथ्वीच्या रोटेशनचा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. या व्हिडिओ मध्ये आकाश गंगा ही लपलेली दिसते आहे. तर तारे अस्थिर दिसत आहेत.

डोंगर,पठारे हे 360 डिग्री मध्ये फिरताना दिसत आहे. यामध्ये आकाशातील रंग अतिशय सुंदर आणि तपकीरी रंगाचे दिसत आहे. तसेच पृथ्वीवर वाहनांची अथवा विविध गोष्टींची वाहतूक सुरु असून ते लहान लाईट्स सारखे चमचमताना दिसते आहे. @wonderofscience नावाच्या पेजने हा व्हिडीओ शेअर केलाय. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ बद्दल अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Home

Leave a Comment