Viral video: सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. तुम्हीच पाहा या अपघातामध्ये नक्की चूक कुणाची?
पिसाळलेला घोडा, रेडा, बैल यांना आवरणं म्हणजे मोठं आव्हानच आहे. अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तरी त्याचं काय होईल, या कल्पनेनंच घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
या अपघातामध्ये नक्की चूक कुणाची ?
तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला काही गुरांमध्ये भांडण झाले. त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला गाय थेट धडकल्याने दुचाकीस्वार थेट बसखाली आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वेलयुधराज असे या ५८ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून तो न्यायालयात कर्मचारी होता. मृत व्यक्ती वेलयुधराज मॅजिस्ट्रेट कोर्टात काम करत असून बाईकवरून त्याच्या ऑफिसला जात असाताना हा अपघात झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दोन गायी रस्त्यावर भांडताना दिसत आहेत. दरम्यान, वेलयुधराज हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका गायीने त्यांना धडक दिली. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या बसची त्यांना धडक बसली आणि ते बसखाली गेले.
पाहा व्हिडीओ –
या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे दिसून येत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. या घटनेत एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पुन्हा एकदा कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. मात्र, काही व्हिडीओ असे असतात, जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडीओ अनेकदा धडकी भरवणारे असतात. त्यातलाच हा एक व्हिडीओ. सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होतात की, त्याची चर्चा सगळीकडे असते.