Crop Compensation : शेतकऱ्यांना; नुकसान भरपाई १७७ कोटी निधी मंजूर, कोणत्या जिल्ह्याला किती मदत?

Crop Compensation Fund: गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नुकसान भरपाईचा १७७ कोटी ८८ लाख निधी मंजूर, कोणत्या जिल्ह्याला किती मदत

crop compensation : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलं आहे. अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. crop insurance

हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झाले आहे. दरम्यान, राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.

महसूल मंडळ विभागनिहाय मदत यादी पहा

राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते.

त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला. दिनांक ४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

NCP Maharashtra News : सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; निवडणूक आयोगाचा निर्णय

तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मादविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

महसूल मंडळ विभागनिहाय मदत यादी पहा

महसुली विभागनिहाय वितरीत निधी 

एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

Leave a Comment