Construction steel price: घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम स्टीलच्या (लोखंड) किंमतीत मोठी घसरण steel price today

Construction steel price today: घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम स्टीलच्या (लोखंड) किंमतीत मोठी घसरण.

मुंबई – सर्व सामान्यांसाठी लग्न बघावं करून आणि घर पाहावं बांधून, अशी एक म्हण मराठीत आजही ग्रामीण भागात खूप प्रचलित आहे. कारण, ‘लग्न आणि घर’ या दोन्ही गोष्टी म्हणजे अशा आहेत सर्व सामान्यांसाठी स्वप्न सत्यात उतरवणे अशाच असतात. त्यामुळे, घर बांधताना सध्या बाजार भावात बांधकाम वस्तू साहित्यांची किंमत किती आहे. या वस्तूंच्या किंमतीच्या कमी झालेल्या दरांचा अंदाज घेऊनच माणूस घर बांधायला सुरुवात करत असतो. सध्या आपण घराचे बांधकाम काढले असेल तर आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. कारण, बांधकामासाठी लागत असलेल्या स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

 

घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण

👉येथे लोखंडाचे भाव पाहा

सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय लोकांचं आयुष्यच जणू या गोष्टींसाठी खर्ची होत असते. कारण, मुलांची शिक्षण त्यांची लग्न आणि घराचं बांधकाम हेच काय ते आयुष्याचं गणित असत. म्हणूनच, घर बांधताना माणूस स्वस्त-महाग या बाबींचा खूपच विचार करत असतो. मात्र, युक्रेन-रशिया युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात महाग झालं होतं. बांधकाम स्टीलचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी स्टॉक (Stock) करणं देखील बंद केलं होतं. तर, या किंमती कमी करण्याची मागणीही सरकारकडे करण्यात आली होती.

मार्च महिन्यात बांधकाम स्टील म्हणजे सळयांची किंमत ही जवळपास 70 हजार रुपये प्रति टन म्हणजे 70 रुपये किलो एवढी होती. मात्र, मे महिन्यात या किंमतीत मोठी घट झाली असून एप्रिल महिन्यात 76 रुपये प्रति किलो असलेलं स्टील आता मे महिन्यात मात्र 61,525 रुपये टनांवर येऊन पोहोचले आहे. म्हणजेच, बाजारात 61-62 रुपये किलो दर आहेत.

 

बांधकाम लोखंडाच्या किंमतीत मोठी घसरण लोखंडाचे दर

👉येथे क्लिक करून पाहा

स्टील विक्रेते युसूफ लोखंडवाला यांनी सांगितले की, यापूर्वी लोखंडाच्या किंमतीत दिवसाला 100 ते 200 रुपयांची वाढ होत होती. आता, एक दिवसात 1000 ते 2000 रुपयांची चढ-उतार होत आहे. गेल्या काही दिवसांत 3000 रुपयांनी दर कमी झाले होते. मे आणि जून महिन्यात सर्वाधिक लोखंड विकले जात असते. मात्र, कोरोना आणि तेजीमंदीमुळे लोखंड विक्रीच्या व्यवसायात यंदा 40 टक्केच खरेदी दिसून आली आहे. construction steel prices

या दरम्यान, बाजार भावात होत असलेल्या चढ-उतारामुळे व्यापाऱ्यांची खूपच कोंडी होत आहे. कारण, व्यापारी कंपनीकडून चढ्या दराने माल मागवत आहेत. मात्र, गाडी दारात पोहोचेपर्यंत दर पुन्हा कमी झालेले असतात. याचा फटका व्यापाऱ्यांनाच बसत आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता माल स्टॉक (Stock) करणे देखील बंद केल्याचे लोखंडवाला यांनी सांगितले. दरम्यान, सध्या स्टीलचे भाव कमी झाल्यामुळे घर बांधकाम करणाऱ्यांना ही चांगली संधी आहे.

 

बांधकाम स्टीलच्या किंमतीत मोठी घसरण लोखंडाचे नवीन दर

👉येथे लोखंडाचे भाव पाहा

मात्र, जगात काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामळे गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात महागलं होतं. बांधकाम स्टीलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापाऱ्यांनी स्टॉक करणंही बंद केलं होतं. तर, या किंमती कमी करण्याची मागणीही सरकारकडे केली होती. “construction steel prices”

Leave a Comment