प्री वेडिंग फोटोशूटसाठी कपल्स विविध थीम ठरवतात. त्यात काही हस्स्यास्पद किस्से सुद्धा घडतात. असाच एक मजेशीर प्री वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडीओ –
सुंदर आउटफीटमध्ये हे दोघेही एका तलावात गेलेत. तलावामध्ये त्यांनी एक छोटी होडी ठेवली आहे. आता या होडीमध्ये बसून त्यांना मस्त फोटोशूट करायचंय. मात्र त्यात या दोघांची चांगलीच फजिती झालीये. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला ग्रूम या होडीमध्ये जातो. त्यानंतर ब्राइड देखील होडीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते.
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे इमोजी आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भर पावसात पाण्यात आणि तेही छोट्याशा होडीत फोटोशूट करण्याचा या जोडप्याचा प्लान चांगलाच फसला आहे. @uthram_wedding_films या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय.