रीलच्या नादात झालं होत्याचं नव्हतं; पाण्याच्या प्रवाहात क्षणात तरुणी गायब, Video Viral

रीलच्या नादात होत्याचं झालं नव्हतं; पाण्याच्या प्रवाहात क्षणात तरुणी गायब; Viral Video

Viral Video : कधी कधी मोबाईल वापरकर्ते इतके व्यस्त असतात की, त्यांना त्यांच्या बाजूला काय घटना घडली, याची पण कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे, एक तरुणी मोबाइल वर रील बनवण्याच्या भानगडीत स्वतःचा जीव गमावून बसली, त्याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

वायरल व्हिडीओ पहा

 

https://www.instagram.com/reel/C7fu5xAvQvK/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

 

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे, पण काहीजण जीव धोक्यात घालतात. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, बाईकवर किंवा कारवर स्टंट करताना अनेकांनी प्राण गमावले आहेत. पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका, असे अनेकदा सांगितले जाते; मात्र तरुणाई ऐकत नाही, आणि त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागतो. धबधब्यावर स्टंट करताना एक तरुणी दुर्घटनाग्रस्त झाली, आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

वायरल व्हिडीओ पहा

 

काही असे लोक असतात त्यांना स्टंटबाजीची फारच हौस असते आणि ते संधी मिळताच विचित्र स्टंट करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी कधी कधी त्यांच्यावरच उलटते. प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंट करणाऱ्यांना त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागतो, असे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच एक प्रकार एका तरुणीसोबत घडला असून, तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अशी घडली घटना

एक तरुणी साडी नेसून डॅमवर आली आहे, रील करण्यासाठी जीव धोक्यात घालून डॅमच्या मधोमध उभी आहे. रीलसाठी स्टंटबाजी करण्याचा मोह तिला आवरत नाही, म्हणून ती तिथेच उभी राहून “तू पागल प्रेमी आवारा” या गाण्यावर रील व्हिडिओ शूट करू लागते. नंतर ती खाली झोपून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते. जीवावर बेतणारे स्टंट करणाऱ्यांना नक्कीच धडा मिळतो, हे बऱ्याच व्हिडिओ मध्ये आपण पाहतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणी पाण्यात दिसेनाशी होते.

 

भुशी धरणात कुटुंब गेलं वाहून व्हिडीओ पहा Viral Video

 

Home

Leave a Comment