‘अल्ट्राव्हायोलेट’ एफ 77 माक-2 चा जलवा! सुपरकार ‘ब्लॉन्डी’च्या व्हिडीओत स्थान

Ultraviolette super bike बंगळुरूस्थित इव्ही कंपनी ‘अल्ट्राव्हायोलेट’ने आपल्या कारकिर्दीत मैलाचा दगड पार केला आहे. प्रत्येक भारतीय वाहन उत्पादक कंपनीसाठी ही स्वप्नवत बाब असते, ती या  ‘अल्ट्राव्हायोलेट’ने पूर्ण केली आहे, कारण त्यांची एफ 77 माक 2 ला सुपरकार ब्लॉन्डीच्या व्हिडिओत स्थान मिळाले आहे.

सुपरकार ब्लॉन्डीच्या माध्यमातून मुख्यतः आकर्षक वाहनांचेच दर्शन घडवले जाते. फेरारी, लॅम्बोर्गिनी अशा उत्पादकांच्या वाहनांचा त्यात समावेश आहे. उत्पादनात नाविन्यता आणि अद्भुत संकल्पना असलेल्याच वाहनांनाच त्यात  संधी मिळते. अशा बड्या कंपन्यांच्या नावांना संधी देणाऱ्या शो मध्ये अल्ट्राव्हायोलेटएफ 77 Mach 2 ला संधी मिळणे ही अत्यंत मानाची आणि खूप मोठी गोष्ट आहे.

अलेक्स हिरची ही सुपरकार ब्लॉन्डी या नावाने प्रसिद्ध आहे. यु ट्यूबवर त्यांचे 16 दशलक्ष फॉलोअर आहेत आणि इंस्टाग्रामवर त्यांचे 16 दशलक्ष फॉलोअर आहेत. जगभरात ती सर्वोत्तम ऑटो इन्फ्लूएंसर म्हणून ओळखली जाते. तिचे लक्ष वेधून घेणे हा देशासाठी दैदीप्यमान क्षण आहे. भारताच्या सामर्थ्याचे यामुळे जगभरात दर्शन झाले आहे.

अलीकडेच अपलोड केलेल्या व्हिडिओत सुपरकार ब्लॉन्डीने अल्ट्राव्हायोलेटF 77 Mach 2 ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाईक म्हणून सादर केली. त्यासाठी दोन आव्हाने ठेवली होती. F 77 Mach 2 ही जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित जलतरण तलावात 20 मीटर बुडवली गेला. दुबई येथे हा तलाव आहे. तर दुसरे आव्हान म्हणजे एक शर्यत होती. यावेळी F 77 Mach 2 ची स्पर्धा कोणत्याही वाहनाशी नव्हती, तर या बंगळुरूच्या या इलेक्ट्रिक सुपर बाईकची शर्यत चक्क जेट क्षमता असलेल्या आरसी प्लेन शी लावण्यात आली होती.

अल्ट्राव्हायोलेट एफ 77 जेव्हा पहिल्यांदाच बाजारात आली होती तेव्हा तिची स्पर्धा केटीएम, कावासाकी, होंडा आणि यामाहा अशा कंपन्यांच्या वाहनांशी झाली होती. आता नव्याने लॉन्च झाल्यानंतर F 77 Mach 2अल्ट्राव्हायोलेटने पुन्हा एकदा बाजी मारली आणि ही इलेक्ट्रिक बाईक जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

 

 

अत्याधुनिकतेचे दर्शन 

F 77 Mach 2 ने काहीतरी साध्य करतानाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसून येत होते. तो प्रसंग होता दुबई येथे सर्वात मोठ्या मानवनिर्मित तलावात बुडवण्यात आली होती. या प्रसंगातून अल्ट्राव्हायोलेटच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार दिसून आला. तसेच अभियांत्रिकी अत्याधुनिकता सुद्धा दिसून आली. जिची बांधणी एव्हिएशन उद्योगातील डिझाइनर आणि अभियंते यांच्याकडून करण्यात आली आहे.

या प्रसंगाची दृश्ये अद्भुत आहेत. एक सादरकर्ता F 77 Mach 2 सह पाण्याच्या पातळीच्या खाली 20 मीटर्सपर्यंत होता, त्यातून या वाहनाच्या बांधणीतील अत्याधुनिकता स्पष्ट होते. बंगळुरू येथे तयार करण्यात आलेले हे वाहन जगातील अत्याधुनिक वाहनांशी स्पर्धा कारण्यासाठी सज्ज झाले आहे, हे स्पष्ट झाले आहे.

अद्भुत शो 

F 77 Mach 2 जे बंगळुरू येथील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह यांच्याकडून तयार करण्यात आले आहे. या वाहन उत्पादक कंपनीला त्यांच्या चाहत्यांकडून “टेस्ला ऑफ इंडिया” या नावाने ओळखले जाते. या वाहनांची स्पर्धा आरसी जेट धावपट्टीवर घेण्यात आली हे विशेष.

अल्ट्राव्हायोलेटF 77 Mach 2 ला प्रचंड लोकप्रियता मिळाली असून दुचाकी वाहनांच्या चाहत्यांमध्ये ती विशेष लोकप्रिय ठरली आहे. 40. 2 एचपी, 100 एन एम इलेक्ट्रिक मोटार असलेली ही दुचाकी 6 ते 60 किमी प्रति तास वेग अवघ्या 2. 8 सेकंदात घेते आणि तिची सर्वोच्च वेगमर्यादा 155 किमी प्रति तास इतकी आहे. भारतात उत्पादीत होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनात ही सर्वाधिक वेगाने धावणारी दुचाकी आहे.

इलेक्ट्रिक कार्यक्षमतेच्या बाबतीत या दुचाकीची सर्वोच्च क्षमता तपासण्यात आली आहे. आरसी जेट विमानाशी तिची स्पर्धा घेण्यात आली, यावरून तिच्या क्षमतेचा अंदाज येतो. या शर्यतीत अल्ट्राव्हायोलेटने जेटशी स्पर्धाच केली नाही, तर जेटला मागे देखील टाकले. हा अभुतपूर्व क्षण आणि स्तिमित करणारा अनुभव होता. “हे काय अद्भुत घडतंय?” अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली.

हे अत्याधुनिक फिचर

सुपरकार ब्लॉन्डीने जारी केलेल्या व्हिडिओत अत्याधुनिक वैशिष्ट्यांवर भर देण्यात आला आहे. अल्ट्राव्हायोलेटF 77 Mach 2 मध्ये रिजनॅरेटिव्ह ब्रेकिंगची सुविधा देण्यात आली आहे. ब्रेक लावताना बॅटरी रिचार्ज केली जाते. स्वीचेबल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि रायडींग मोडस ही या दुचाकीची वैशिष्ट्ये आहेत. इन हाऊस डेव्हलप्ड व्हायोलेट एआय, डिजिटल डिस्प्ले आणि इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट स्टोरेज ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. बहुतांश दुचाकी धारकांना ही वैशिष्ट्ये निश्चित आवडतील. या वाहनासह आपल्याला कागदपत्रे सोबत नेण्याची आवश्यकता नाही. एखाद्यावेळी आपण कागदपत्रे विसरलो आणि पोलिसांनी पकडले तर ते त्वरित सोडून देऊ शकतील.

जगभरासाठी भारतात उत्पादन 

भारतातच थांबून राहू नका हे अल्ट्राव्हायोलेटचे ध्येय आहे. बंगळुरू स्थित इव्ही स्टार्ट अप असलेली ही कंपनी F 77 Mach 2 लवकरच युरोपात दाखल होणार आहे. हे यश मिळवणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे. “मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड: या ध्येयाच्या दिशेने अल्ट्राव्हायोलेटने वाटचाल सुरु केली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादन क्षेत्रात भारताचे महत्व यामुळे अधोरेखित होत आहे.

सुपरकार ब्लॉन्डीकडून सादरीकरण 

सुपरकार ब्लॉन्डीची ही विशेषता आहे की, ती अपवादात्मक वाहनेच सादर करते. अल्ट्राव्हायोलेटF 77 Mach 2 ही फक्त एंडोर्समेंट नाही तर कंपनीच्या इव्ही मोबिलिटी प्रोडक्ट संदर्भातील कटिबद्धता अधोरेखित करणारी आहे. आता अल्ट्राव्हायोलेट युरोपात जात आहे F 77 Mach 2 ही जागतिक व्यासपीठावर भारतीय इलेक्ट्रिक वाहनांचे पदार्पण ठरणार आहे तसेच भारतीय इव्ही सेक्टर क्षेत्राच्या प्रगतीचे निदर्शक आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Home 🏠

Leave a Comment