रिल्ससाठी काहीपण! पुण्यात तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी तुफान वायरल

पुणे : सध्या जगभरामध्ये रिल्स बनवण्याचे वेड वाढले आहे. आजकालच्या तरुणाईला रिल्स काढण्याची प्रचंड आवड असून यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी चक्क रिल्ससाठी इमारतीवरुन खाली पडल्याचा स्टंट करत आहे. रिल्ससाठी हा जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली जीवघेण्या स्टंटबाजीची व्हिडिओ पुण्यातील आहे. पुण्यातील स्वामीनारायण मंदिराजवळ काही तरुण तरुणी रिल्ससाठी जीवघेणा स्टंट करत असल्याचे दिसून आले आहे. रिल्सकाढून सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाई कोणत्या थराला जाईल याचा अंदाज न लावलेलाच बरा आहे. पुण्यातील एक तरुणी व दोन तरुण अशा तिघांनी उंच इमारतींवरुन उडी मारण्याची स्टंटबाजी केली. यामध्ये तरुणी स्वतः काही उतरत बेफिकरीने खाली जात असल्याचे दिसत आहे.

रील का चक्कर… मूर्खपणाचा कळस आहे फक्त.. सुरक्षा, काळजी ह्याबद्दल ह्यांनी कधीच वाचले नसेलच…!

स्थळ -अंदाजे दरीपूल, पुणे असावे!!!

 

व्हिडिओ पहा –

 

 

Viral Video तलावात तरंगत होता मृतदेह आणि पोलिसांनी बाहेर ओढताच बसला उठून व्हिडीओ पहा

 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तरुणांवर रोष व्यक्त केला आहे. Moonfirescom या सोशल मीडिया हॅन्डलकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 19 जून रोजी व्हिडिओ शेअर केल्यापासून व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. नेटकऱ्याने लिहिले आहे की, चुकून जरी ही मुलगी हातातून सटकली असती तर थेट मेली असती किंवा अपंग झाली असती. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, अशा जीवघेण्या स्टंटबाजी करणाऱ्या लोकांना तीन महिन्यांची शिक्षा झाली पाहिजे, असा रोष नेटकरी व्यक्त करत आहेत. तर एका नेटकऱ्याने थेट पुणे पोलिसांना टॅग करून त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली: “पुणे पोलिस, कृपया कारवाई करा, धन्यवाद!” असे या नेटकऱ्याने लिहिले आहे.

 

Viral Video कपलने पार्कमध्ये केलं असं काही व्हिडिओ झाला तुफान वायरल

 

Home

Leave a Comment