रेशन कार्ड धारकांना खूशखबर! 6 वस्तू मिळणार मोफत, शासन निर्णय जारी
मागील वर्षीपासून सणानिमित्त आनंदाचा शिधाशासनाकडून वाटप करण्यात येत आहे. यंदा गौरी गणपतीच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्रमुख कुटुंब शिधापत्रिका आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये केशरी शिधापत्रिका असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना हा शिधा गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने वितरित केला जाणार आहे.
गावनिहाय राशन कार्ड यादीत नाव पहा
आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत कोणते धान्य मिळणार, कसे मिळणार आणि कोठे मिळणार याची संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत.गौरी गणपती उत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे हा आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे. यामध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ आणि एक लिटर तेल मिळणार आहे.
आनंदाचा शिधा 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या एका महिन्याच्या कालावधीत वितरित केला जाणार आहे. हा शिधा ई-पास प्रणालीद्वारे वितरित होईल आणि शंभर रुपये प्रतिशिधापत्रिका दराने दिला जाईल. ही सर्व माहिती जीआरमध्ये दिली आहे. हा जीआर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा.