त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
CM Eknath Shinde
सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांना पुढच्या ४० तासात म्हणजेच २९ सप्टेंबरला पैसे जमा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांना अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होत आहेत त्याबाबत मेसेज महिलांच्या मोबाईलवर पाठवले जात आहे.
लाडकी बहीण योजनेत पैसे आलेत की नाही कसं चेक करावं?
लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येईल. तसेच तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन पैसे आलेत की नाही ते पाहावे लागेल. तसेच ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येही तुम्हाला पैसे आलेत की नाही हे समजेल. तुमचे पोस्टात अकाउंट असेल तर तिथे जाऊन तुम्ही पासबुकवर एन्ट्री करुन पैसे आलेत की नाही चेक करु शकतात.