Ladki Bahin Yojana: सप्टेंबर महिन्यात फॉर्म, मेसेज आला? आता काही तासात जमा होणार बाकी पैसे

Ladki bahin yojana महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित आले आहेत. Cm Eknath Shinde

त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

या योजनेत सप्टेंबर महिन्याचा हप्ता २९ तारखेला जमा केला जाणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ केली जाऊ शकते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढली जाऊ शकते. (Ladki Bahin Yojana)

CM Eknath Shinde

 

सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांना पुढच्या ४० तासात म्हणजेच २९ सप्टेंबरला पैसे जमा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांना अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होत आहेत त्याबाबत मेसेज महिलांच्या मोबाईलवर पाठवले जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ तारखेला मुलांच्या खात्यात जमा होणार आहे.लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे दिले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना १५०० की ४५०० रुपये मिळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

लाडकी बहीण योजनेत पैसे आलेत की नाही कसं चेक करावं?

लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येईल. तसेच तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पैसे आले की नाही हे चेक करु शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन पैसे आलेत की नाही ते पाहावे लागेल. तसेच ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येही तुम्हाला पैसे आलेत की नाही हे समजेल. तुमचे पोस्टात अकाउंट असेल तर तिथे जाऊन तुम्ही पासबुकवर एन्ट्री करुन पैसे आलेत की नाही चेक करु शकतात.

यादीत नाव पहा

Home 🏠

Leave a Comment