Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? ‘हे’ काम लगेच करा

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आतापर्यंत जूलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते महिलांना मिळाले आहेत. आणि आता सप्टेंबर महिन्याचा हफ्ता पडण्यास सुरुवात झाली आहे. Aditi Sunil Tatkare

त्यानंतर आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर लाभ मिळणार आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवली आहे. या योजनेत काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तर आज आम्ही तुमचे पैसे का आले नाहीत याची कारणे सांगणार आहोत. त्याचसोबत तुमचा पेमेंट स्टेट्‍स कसा चेक करायचा हेदेखील सांगणार आहोत.

PM Matru Vandana Scheme: गरोदर महिलांसाठी सरकारची खास योजना! मिळणार ६ हजार रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे न मिळण्याची कारणे

अर्जाला मंजुरी दिली नाही

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमच्या अर्जाला मंजुरी दिली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. काही आवश्यक कागदपत्रांची कमतरता असेल तर तुमचे अर्ज स्विकारले जाणार नाही. Aditi Sunil Tatkare

(DBT) डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय नसणे

जर तुमचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंट सक्रिय नसेल तर तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळणार नाही.

अधिकाऱ्यांकडून अर्जाला मंजुरी नाही

जर तुमच्या अर्जाला अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली नाही तर तुम्हाला पैसे मिळू शकत नाही. तुमचे अर्ज अधिकारी चेक करतात, तुम्ही पात्र आहात की नाही याबाबत माहिती पडताळून पाहतात. त्यानतंरच तुम्हाला पैसे मिळतात.

आधार कार्ड-बँक अकाउंट लिंक नसणे

जर तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड नंबर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. आधार कार्ड आणि बँक लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊ शकतात किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

Schemes For Women: लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी… महिलांसाठी सरकारच्या या योजनेत मिळणार लाखो रुपये

लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्यावर काय करावे?

  • लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे मिळाले नाहीत याचे स्टेट्‍स चेक करण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करावे लागेल. जर तुमचे नाव त्या लिस्टमध्ये नसेल तर स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
  • तुमचे DBT अकाउंट सक्रिय आहे की नाही हे चेक करा. जर तुमचे हे अकाउंट सक्रिय नसेल तर बँकेत जाऊन लगेच सुरु करुन घ्या.
  • जर यानंतरही तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुमच्या गावच्या पंचायत किंवा नगर निगम अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
  • जर तरीही तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्ही १८१ या हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन तुमची तक्रार दाखल करु शकतात.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही? या सोप्या पद्धतीने करा चेक

 

Home🏠

Leave a Comment