महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत सुरु असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यवतमाळ इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर आपला निशाणा साधला.
1 कोटी 7 लाख बहिणींच्या खात्यात पैसे आले
एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र बंद करणाऱ्यांची तोंड ही गर्दी पाहून बंद होतील. अत्यंत कमी वेळेत आम्ही एक कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त महिलांची नोंदणी लाडकी बहिण योजनेसाठी झाली. यापैकी एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत.
लाडकी बहीणसाठी नवीन वेबसाईट सुरू 2मिनिटांत आता येथे करा अर्ज
विरोधक नंतर जमीनीवर लोळू लागतील.
मुख्यमंत्र्यांनी बहिणींना दिला शब्द
एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांचं म्हणणं असं आहे की, बँकेत पैसे जमा होणार नाही पण पैसे जमा जसे झाले तसे यांचे चेहरे पांढरे फटक झाले. काळे ठिक्कर झाले. बुरी नजर वाले तेरा मुंह काला अशी त्यांची अवस्था झाली आहे. हे देणारे सरकार आहे, घेणारे सरकार नाही. काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील. मी शब्द देतो की, आणखी पुढचे दोन हप्ते सप्टेंबर महिन्यात जमा होतील.
ही देना बँक आहे..लेना नही
महिन्यांना तीन सिलिंडर मोफत मिळणार
एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या बहिणींच्या तक्रारी आहेत, त्यांच्या तक्रारी सोडवल्या जातील. आम्ही लाडक्या भावांना सहा, आठ आणि दहा हजारांचे महिन्याला मानधनही मिळत आहे. त्यांना रोजगार मिळत आहे. आता तीन सिलिंडर या बहिणींना मोफत घेण्याचा आपला निर्णय आहे.